Posts

Showing posts from February, 2021

सुविचार कशासाठी?

  सुविचार कशासाठी? इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे,"A drop of ink makes millions think." शाईचा एक थेंब लाखो लोकांना विचार करायला लावतो.एवढे लेखनाचे महत्त्व आहे. हजारो पुस्तके वाचून जे मिळणार आहे, ते एका सुविचारातून मिळते.सुविचार हा विचारांचे सार आहे. समुद्रमंथनातून ज्या प्रमाणे अमृत काढावे त्याचप्रमाणे थोरामोठ्यांच्या विचारमंथनातून सुविचार जन्माला येत असतात.सुविचारातून माणूस विचारशील व प्रेरणाशील बनतो.एक विचार माणसाला दिशा दाखवतो. प्रगतीच्या मार्गावर चालायला प्रवृत्त करतो.माणसाचा आचार हा त्याच्या विचारांवर अवलंबून असतो.जसे विचार तसा आचार.आचार म्हणजे आचरण,वर्तणूक.म्हणून चांगल्या आचारासाठी चांगले विचार महत्वाचे आहेत.हे विचार आपल्याला थोरांच्या वाचनातून मिळतात.थोर माणसे काही उगाच मोठी झालेली नसतात.ती आपल्या कार्य कर्तृत्वाने मोठयापदाला पोहोचलेली असतात.त्यांचे जगावेगळे विचार त्यांना येथपर्यंत घेऊन आलेले असतात.या संपूर्ण काळातील त्यांचे अनुभव व यातून आलेले चिंतन म्हणजेच या महान लोकांचे विचार असतात.ते आपल्यासाठी सुविचार बनतात.हेच सुविचार आपण जर अंगिकारले व त्यानुसार आपले आचरण ठेवत गेलो,त...