ऑनलाइन शिक्षण घेतांना..
ऑनलाइन शिक्षण घेतांना... किरण दशमुखे,सटाणा(नाशिक) B.Sc.,B.Ed.,M.A.,M.Phil.,D.S.M. बदल हा निसर्गाचा नियम आहे. काळाच्या गतीनुसार माणूस किंवा इतर प्राणी स्वतःमध्ये बदल करीत आला आहे म्हणून ते आज टिकून आहेत. ज्यांनी बदलाचा स्वीकार केला किंवा बदलाला सामोरे गेले ते आपणास प्रगतीपथावर दिसून येत आहेत.ज्यांनी निसर्गाच्या बदलाचा विरोध केला असे प्राणी संपुष्टात आले आहेत. मानव प्राणी हा सर्वात बुद्धिमान असल्याने तो निसर्गाच्या आव्हानाला योग्य प्रकारे तोंड देण्यास सिद्ध होतो. जगभर कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असल्याने माणसाचे जगणे ठप्प झाले आहे. अनेक जण कोरोनाच्या तडाख्याने मृत्युमुखी पडले आहेत. पण थांबेल तो माणूस कसला! माणसाने आपले व्यवहार ऑनलाइन पद्धतीने चालू ठेवले. लाखो बालकांचे शिक्षण थांबले. काही काळ शिक्षणाची चाके थांबली असली तरी ऑनलाइन पद्धतीने पुन्हा विद्यार्थ्यांना शिक्षण देणे चालू झाले आहे. ज्यांनी या बदलाचा स्वीकार केला त्यांच्या मुलांमध्ये समाधानकारक प्रगती दिसून येत आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमासाठी अनेक प्रकार सध्या मोबाईलवर उपलब्ध आहेत. त्यातील झूम मीट, गुगल मीट यासार...