एका नव्या क्रांतीची गरज...
एका नव्या क्रांतीची गरज.. किरण दशमुखे,सटाणा ८ ऑगस्ट हा दिवस देशभर क्रांती दिन म्हणून दरवषी साजरा केला जातो. आपण बघितले असेल क्रांती ही सामान्य माणसांनी केलेली आहे. धनदांडग्या व भरलेल्या पोटांच्या लोकांनी क्रांती केली नाही. देश गुलामीत असताना त्यांनी गोऱ्या इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वराज्य मिळाले पण सुराज्या चे काय? आज मात्र आपल्याला आपल्याच काळया इंग्रजांविरुद्ध क्रांती करायची गरज आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत.हा आनंद लुटत असताना आपण थोडे इकडे तिकडे देखील पाहिले पाहिजे.आपल्या आजूबाजूला कित्येक गरीब लोक अजूनही हलाखीचे जीवन जगत आहे.त्यांच्या जीवनात अजून दारिद्य्र,अज्ञान,रूढी परंपरा यांचा अंधारच आहे.त्यांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट अजून उगवलीच नाही.काय त्यांच्याही झोपडीत आपल्या वाटचा स्वातंत्र्य सूर्याचा उजेड पेरण्याची गरज आपल्याला वाटत नाही?स्वातंत्र्याचा आनंद काय फक्त आपण एकट्यानेच लुटायचा?स्वातंत्र्य ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.प्रश्न आहे तो आपण ती तेवढ्या जबा...