माझे पहिले भाषण
* माझे पहिले भाषण * किरण दशमुखे,सटाणा माझे वडील प्राथमिक शिक्षक असल्याने आणि ज्या गावाला बदली त्याच गावात राहायचे असे त्यांचे धोरण असल्याने माझे संपूर्ण शालेय शिक्षण खेडेगावातच झाले. तेथे अर्थातच सुविधांची वानवा होती. मात्र तरीही शाळेत महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त शिक्षक मला भाषण करायला सांगत. कधीकधी शिक्षकांच्या घरी जाऊन मी कागदावर भाषण लिहून ते पाठ करून दुसऱ्या दिवशी शाळेत, वर्गात मुलांसमोर बोलून दाखवत असे. मात्र हे सर्व शाळे पुरताच मर्यादित होते. माझ्या भाषणाची खरी सुरुवात झाली, त्याची मात्र एक गंमत आहे. साधारण पस्तीस वर्षांपूर्वी आमच्या गावात अण्णा जगताप म्हणून एका तरुण दलित कार्यकर्त्यांने बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे ठरवले. हे गाव तसे दुर्गम भागात असल्याने तालुक्यातून या गावात यायला रस्ता देखील चांगला नव्हता. दिवसातून एक वेळच बस येत होती. तेव्हा या कार्यक्रमाला वक्ता कोणाला बोलवावे हा विचार त्यांच्यापुढे उभा ठाकला होता. मात्र कार्यकर्ते उत्साही होते आणि मागे हटणारे नव्हते. काही तरी नवीन करण्याची त्यांची उमेद ...