गुणवत्तापूर्ण शिक्षण
देशातील बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी शिक्षण व्यवस्थेचे प्रमुख असलेल्या शिक्षकांनी त्या दिशेने स्वतःमध्ये काही सकारात्मक बदल घडविणे महत्त्वाचे आहे.आज शिक्षणामध्ये नवनवीन बदल येत आहेत.अनेक कृतीशील शिक्षक आपल्या कल्पकतेने या बदलांना सामोरे जात आहेत. तसेच आपल्या सृजनशक्तीने शिक्षणामध्ये आनंददायी बदल घडवून आणत आहेत. शिक्षणाची प्रक्रियाच मुळात आनंददायी असली तर मूल आपोआप शिक्षणाकडे आकर्षित होईल.मुलांचे शाळाबाह्य होण्याचे प्रमाण कमी होईल.गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास चांगले विद्यार्थी शिकून बाहेर पडतील. यासाठी शिक्षकाने नवनवीन उपाय योजना आखणे अतिशय महत्त्वाचे आहे.नव्याने शिक्षण क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या शिक्षकांसाठी काही गोष्टी पुढे दिलेल्या आहेत.यातील बऱ्याच गोष्टी शिक्षक करत असतात. मात्र शिक्षक कृतीला उजाळा मिळावा या दृष्टीने आपण काही गोष्टी जाणून घेऊ या... १)सर्वप्रथम शिक्षक किंवा बाहेरील कुणी ज्येष्ठ व्यक्ती,पाहुणे वर्गात आल्यावर मुलांना उभे राहून गुड मॉर्निंग टीचर,गुड मॉर्निंग सर असे म्हणण्याची सवय लावावी. २) मुलांना विशिष्ट अंतरावर शि...